
आंबेगाव तालुक्यातील काठापूर ते पोंदेवाडी रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असून या रस्त्याचे काम करण्यासाठी ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने अनेक ठिकाणी रस्ता खोदला आहे. मात्र दोन महिन्यापासून काम बंद अजून ठेकेदार कोठे गायब झाला आहे. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

काठापुर बुद्रुक ते पोंदेवाडी रस्ता काँक्रीटी करणासाठी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साधारण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून गेली दोन महिन्यापासून या रस्त्याचे काम बंद असून या रस्त्यावर पाच ते सहा अपघात झाल्याचे पोंदेवाडी येथील अमोल वाळुंज यांनी सांगितले.

पोंदेवाडी – काठापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदला आहे तसेच रस्त्यावर खड्डे पडले असून कामही थांबवले आहेत त्यामुळे अपघात घडताना दिसत आहे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहेत.











