
धामणी ( ता. आंबेगाव ) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत सरपंचपदी राष्ट्रवादीच्या प्रतिक्षा राजेंद्र जाधव यांची थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच पदी निवड झाली आहे. सरपंच रेश्मा अजित बोराडे यांनी लोकनियुक्त सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हि निवडणूक पार पडली.

धामणीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी अर्चना दिपक जाधव, सविता राजेंद्र जाधव, प्रतिक्षा राजेंद्र जाधव हे उमेदवार लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होते त्यामध्ये प्रतिक्षा राजेंद्र जाधव ह्या १५५ मतांनी लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडून आल्या आहेत.
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे १) अर्चना दिपक जाधव, कपबशी ८५०,
२) जयश्री राजेंद्र जाधव रिक्षा २७५
३) प्रतीक्षा राजेंद्र जाधव – कपाट १००५
याप्रमाणे मते मिळाली.

प्रतिक्षा राजेंद्र जाधव यांची लोकनियुक्त सरपंच पदाची निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भंडाराची उधळण करत पेढे वाटून जल्लोष केला. नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षा राजेंद्र जाधव यांचा सत्कार मंचर येथे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात अनुसया उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील जि.प. उपाध्यक्ष विवेक वळसे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व धामणीतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.









