
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे शरद सहकारी बँकेच्या वतीने सेवक प्रशिक्षण व स्नेह मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले.यावेळी बँकेच्या सर्व शाखांतील दैनंदिन ठेव प्रतिनिधींचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात आंबेगाव तालुक्यातील दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून बँकेच्या मंचर शाखेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी जयेश विनोदचंद्र शहा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या बरोबरच संदीप शेवाळे,विवेक शिंदे, दिनकर मोरडे,राजाराम भोर,सागर पाचपुते, केशर सासवडे यांचाही सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांनी सर्व ठेव प्रतिनिधींचे कौतुक केले यावेळी संचालक शिवाजी लोंढे, अजय घुले, दौलतराव लोखंडे, दत्ताशेठ थोरात, जयसिंग थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव तसेच सर्व विभागप्रमुख, शाखाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जयेश शहा यांनी मंचर शाखेत दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना बँकेच्या व्यवसाय वृद्धीत मोलाचा वाटा उचलला आहे. नियमित संपर्क,ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि प्रामाणिक सेवेमुळे लक्षणीय वाढ साध्य केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले.









