
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावातील अंकिता अनिल वाळुंज वय २२ ही तरूणी पंचायत समिती निवडणुकीत सर्वात तरुण उमेदवार म्हणून निवडून आलेली आहे.
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत अंकिता अनिल वाळुंज यांना उच्चशिक्षित तरुण उमेदवार म्हणून जारकरवाडी पंचायत समिती गनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अंकिता वाळूंज हिने ५९४ मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे. तिच्या या विजयात पक्षाचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, पोंदेवाडी ग्रामस्थ, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व तिचे वडील माजी सरपंच अनिल वाळुंज, आई निलम वाळूंज यांचा मोलाचा वाटा असल्याचे अंकिताने सांगितले.

अंकिता वाळुंज पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे ही लढत अटीतटीची होईल अशी चर्चा मतदारसंघात होती अंकिता वाळूज यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोहिणी वाळूंज या उभ्या होत्या अंकिता वाळूंज यांनी ५९४ मतांनी त्यांचा पराभव केला आहे. अंकिता वाळूज यांचे वडील अनिल वाळुंज यांनी पोंदेवाडी गावचे सरपंच म्हणून काम केले असून खरेदी विक्री संघावर देखील त्यांनी काम केले आहे.

घरातच राजकीय वारसा असल्याने त्यांना जनमताचा कौल मिळाला. घरोघर जाऊन प्रचार व समाजसेवेची आवड असल्याने अंकिता वाळूज यांना हा विजय सोपा झाला असल्याचे बोलले जात आहे. अंकिता वाळूज यांनी विजयानंतर माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांचे आभार मानले. या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे नेते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील पोंदेवाडी गणातील जनतेचे विविध कामे मार्गी लावली जातील असे सांगीतले.











