
आंबेगाव तालुका जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल मंगळवार दिनांक ९ रोजी जाहिर झाला असून आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे पहावयास मिळत आहे. ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती निवडणूक पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ३, शिवसेना एक व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक असे उमेदवार निवडून आले आहे. तर पंचायत समिती निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षांचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

तालुक्यात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत पारगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विवेक प्रतापराव वळसे पाटील, अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातून विष्णू काका हिंगे, शिनोली जिल्हा परिषद गटातून शिला राजेंद्र लोहकरे, हे उमेदवार निवडून आले असून घोडेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या सुवर्णा दरेकर, व कळंब जिल्हा परिषद गटातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रीतीताई थोरात या निवडून आले आहेत. तर पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घोडेगाव पंचायत समिती गणातून कैलास बुवा काळे, कळंब पंचायत समिती गण उषाताई रमेश कानडे, बोरघर पंचायत समिती गण संजय सिताराम गवारी, पिंपळगाव तर्फे महाळुंगे पंचायत समिती गण शिवाजी संपत निघोट, अवसरी बुद्रुक पंचायत समिती गण निलेश नामदेव टेमकर, पेठ पंचायत समिती गण संजय कोंडीबा पवळे, जारकरवाडी पंचायत समिती गण अंकिता अनिल वाळुंज, शिनोली पंचायत समिती गण ज्योती प्रवीण पारधी हे उमेदवार निवडून आले आहेत. तर पारगाव पंचायत समिती गणात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या श्वेता किरण ढोबळे, व चांडोली गणातून प्रियंका केतन वाघ या विजयी झाल्या आहेत.

पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विवेक वळसे पाटील २,८०७ मतांनी विजयी झाले त्यांनी एकूण १३,८०९ मते मिळवली त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे)चे अरुण गिरे यांना ११,००२ मते मिळाली.
अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातून विष्णू काका हिंगे यांनी ६०५ मतांची आघाडी घेत १० हजार ८७८ मते मिळवली. त्यांचें विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार)चे प्रशांत अभंग यांना १०,२७३ मते मिळाली.
शिनोली गटातून शिला राजेंद्र लोहकरे यांनी १०,३६७ मते घेत ३,६४२ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी (शरद पवार)च्या सरिता माळी यांना ६,७२५ मते मिळाली.
घोडेगाव गटात शिवसेना (शिंदेगटाच्या) च्या सुवर्णा दरेकर ११,६७४ मतांसह ३०६ मतांनी विजयी झाल्या. त्याच्या विरोधात राष्ट्रवादी (अजित पवार)च्या मंगल हुले यांना ११,३६८ मते मिळाली.
कळंब गटात राष्ट्रवादी (शरद पवार)च्या प्रीती थोरात १४,१११ मतांसह १,५६१ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी च्या तुलसी भोर यांना १२,५५० मते मिळाली.
पंचायत समिती शिनोली गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्योती पारधी २१४७ मतांनी विजय झाले त्यांना ५,७८२ मते मिळाली त्याच्या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) – सुरेखा गभाले ३,६३५ यांना मते मिळाली.
बोरघर पंचायत समिती गणात राष्ट्रवादी (अजित पवार) संजय गवारी १७४५ च्या मताधिक्याने निवडून आले त्यांना ४,८५२ मते मिळाली त्यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्षाचे राजेंद्र घोडे यांना ३,१०७ मते मिळाली.
पेठ गणात राष्ट्रवादी (अजित पवार) – संजय पवळे १५९५ च्या मताधिक्याने निवडून आले त्यांना ४,७२२ मते मिळाली त्यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे पक्षाचे अंकुश लांडे यांना ३,१२७ मते मिळाली.
घोडेगाव गणात राष्ट्रवादी पक्षाचे कैलास काळे १८५३ मतांनी निवडून आले त्यांना ७,७०९ मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेना (शिंदे) – कपिल काळे यांना ५,८५६ मते मिळाली.
कळंब गनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उषा कानडे ३०५४ मतांनी निवडून आल्या त्यांना ७,८४९ मते मिळाली त्यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे पक्षाच्या राजश्री भालेराव यांना ४,७९५ मते मिळाली.
चांडोली गणात राष्ट्रवादी (शरद पवार) – प्रियांका वाघ १४१२ मतांनी निवडून आल्या त्यांना ७,४५२ मतदान झाले तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सीमा खिलारी यांना ६,०४० मते मिळाली.
जारकरवाडी गणात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या अंकिता वाळुंज ५४८ फरकाने निवडून आल्या त्यांना ६,७४६ मते मिळाली त्यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे पक्षाच्या रोहिणी वाळुंज यांना ६,१९८ मते मिळाली.
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गणात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या श्वेता ढोबळे या ५४२ च्या फरकाने निवडून आल्या त्यांना ६,१७० मते मिळाली त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सुनंदा ढोबळे यांना ५,६२९ मते मिळाली.
अवसरी बुद्रुक गणात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे निलेश टेमकर हे २५७७ मताधिक्याने निवडून आले त्यांना ५,७०४ मते मिळाली त्यांच्याविरोधात भाजपचे अनिकेत भोर यांना ३,१२७ मते मिळाली.
पिंपळगाव तर्फे महाळुंगे गणात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची शिवाजी निघोट हे ४५६ मतांनी निवडून आले त्यांना ५,१६१ मते मिळाली त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे मनोहर इंदोरे यांना ४,७०५ मते मिळाली.











