
कोरेगाव मुळ पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांगीण विकासासाठी सज्ज झालेले तसेच तळागाळातील जनतेचे प्रश्न, शेतकरी, महिला, युवक, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या मूलभूत विषयांना प्राधान्य देत विकास, पारदर्शकता आणि लोकहित या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार आमचा असल्याचे मत नायगाव ग्रामपंचायतीचे प्रभारी माजी सरपंच राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

राजकारण हे पद मिळवण्यासाठी नाही, तर लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असतं. सर्वसामान्य कुटुंबातील दुःख आपलं मानून, त्यांच्या संकटात ढाल बनून उभं राहणारं नेतृत्व म्हणजे आपला माणूस पेठ ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच तथा हवेली तालुका भष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सुरज भालचंद्र चौधरी यांनी कोरेगावमुळ पंचायत समितीच्या गणातील लोकांच्या मनात आपली प्रतिमा निर्माण केली आहे. सामान्यांच्या हक्कासाठी लढा असो किंवा विकासाची जिद्द, सुरज चौधरी नेहमीच जनहिताला प्राधान्य दिलं आहे. सत्तेपेक्षा लोकांच्या मनातील ‘हक्काचा माणूस’ ही ओळख जपणं सुरज चौधरी ला जास्त महत्त्वाचं वाटतं. तुमची अडचण हीच आमची जबाबदारी आहे, आणि तुमच्या न्यायासाठी तो सदैव मैदानात आहे.

सामान्यांचा आधार जनतेचा हक्काचा माणूस. विकासाभिमुख धोरणांना अधिक बळ देत परिवर्तन घडवण्याचा ठाम संकल्प कोरेगावमुळ पंचायत समितीच्या गणातील मतदार राजानं केला असल्याचे मत सुजित चौधरी यांनी सांगितले. ‘चला बदल घडवूया परिवर्तनाचे साक्षीदार होऊ या’ असा निर्धार येथील मतदार राजानं केला आहे. जेव्हा सामान्य माणूस सक्षम होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होतो. केवळ मदतीचा हात देण्यापेक्षा, प्रत्येकाला स्वावलंबी बनवणं आणि त्यांना सन्मानाने जगण्याची ताकद देणं, हेच आमचं मुख्य ध्येय आहे.












