
पारगाव (कारखाना) पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीवर मोठी कारवाई केली असून दुचाकी चोरी करणाऱ्या चार आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण २७ दुचाकी व विविध पोलीस ठाण्यात केलेले १६ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी रितेश फकिरा रोकडे (वय १८, रा. चांडोह, ता. शिरूर)
हर्षद जालिंदर ढवळे (वय २१, रा. फाकटे, ता. शिरूर), प्रथमेश दत्तात्रय ढवळे (वय १९, रा. फाकटे, ता. शिरूर,)
विध्यार्थी बालक (नाव गोपनीय) यांना सापळा लावून अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी या जारकरवाडी तालुका आंबेगाव येथे पाहुण्याकडे गेल्या असता त्यांची दुचाकी एम.एच. १४ एम.बी. ४५२२ ही जिल्हा परिषद शाळेसमोर लावली होती. त्या घरी जाण्यासाठी निघाले असता शाळेजवळ दुचाकी दिसली नाही कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लॉक तोडून चोरून नेली होती याबाबत पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले., पोलीस उपनिरीक्षक भाऊसो लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर पोलीस आमदार चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग संजय साळवे यांनी तांत्रिक तपास, गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान पोलिसांनी चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एकूण २७ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. अटक आरोपींकडे सखोल चौकशी केली असता पारगाव (कारखाना), लोणीकंद, शिक्रापूर, वाघोली, संगमनेर, आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १६ मोटारसायकल चोरीचे गुन्हे या उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, भाऊसाहेब लोकरे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश कालेकर, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे, चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन डामसे, अमोल वडेकर, शंतनू सांगडे, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, राजेंद्र उतळे, निशा गुळवे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन डाके, यशवंत साबळे, संदीप बोराडे, शितल पोखरकर, सुजाता जाधव, काजल फलके पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, प्रदिप बढेकर, अश्पाक शेख, संदीप घुले यांनी केली आहे.











