
उरुळी कांचन – प्रतिनिधी ,
कर्तृत्व, दातृत्व, वक्तृत्व, निष्ठा आणि माणुसकी या पंचगुणांच्या संगमावर उभे असलेले गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे उरुळी कांचन भैरवनाथ सेवा उत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रताप मारुती कांचन आपल्या कुटुंबाचा वारजा पुढं सक्षमपणे चालवत आहे सामाजिक जाणीव ठेवून सातत्याने कार्यरत असणारे युवा नेतृत्व असं मत जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य महादेव कांचन यांनी व्यक्त केले. उरुळी कांचन भैरवनाथ सेवा उत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रताप मारुती कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पांढरस्थळ व तुपे वस्ती’ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅकचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन उपस्थित होते. यावेळी आबासाहेब चव्हाण, सचिन कांचन, सागर कांचन, शरद खेडेकर, दत्तात्रय कांचन, स्वप्नील कांचन, गणेश कांबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली खामकर, जैबुन बागवान, जयदीप कांचन, चंद्रकांत खलसे, बाळासाहेब कांचन, संभाजी कांचन, विलास लोंढे, मारुती ज्ञानोबा कांचन, रामभाऊ तुपे, पोपट तुपे, विकास तुपे, देविदास तळेकर, संजय कांचन, शिवाजी कांचन, बाळासो कांचन, योगेश सातपुते, सुवर्णा कांचन, शिवतेज तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पांढरस्थळ वस्ती वरील ग्रामस्थ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनिल तुपे यांनी केले तर आभार आबासाहेब चव्हाण यांनी मानले.













