
भोसरी (पुणे) येथील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंदिरानगर येथे महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स स्पर्धा (ता.१३) आणि (ता.१४) डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाल्या असुन या स्पर्धेत ३६ ते ३९ या वयोगटात धावण्याच्या स्पर्धेमध्ये मंचर (ता.आंबेगाव) येथील संदीप माशेरे सर यांनी १००,२००,४०० मीटर धावणे मध्ये सुवर्णपदक व ४००×१०० मीटर रीले मध्ये सुवर्णपदक अशी एकूण एकाच स्पर्धेत ४ सुवर्ण पदके पटकावली आहेत. त्यांनी मिळालेल्या यशाबद्दल मंचर ग्रामस्थ, मित्र परिवार यांनी त्यांचें अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर पुणे येथे आयोजित महाराष्ट्र मास्टर गेम चॅम्पियनशिप २०२५ यामध्ये १०० मीटर धावणे २०० मीटर धावणे ४०० मीटर धावणे व ४ X १०० धावणे या चारही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून संदीप माशेरे सर हे राष्ट्रीय मास्टर गेम चॅम्पियनशिप २०२५ – २६ साठी पात्र ठरले आहेत.










