
कळंब गावचे युवा उद्योजक नितीन भालेराव यांनी एकलहरे (ता. आंबेगाव) येथे व्हेज व नॉनव्हेज प्रकारचे सुसज्ज ‘हॉटेल तिरंगा’ सुरू करून परिसरातील खाद्यसेवेत नवी भर घातली आहे. या हॉटेलचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.

उद्घाटन प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, सामाजिक कार्यकर्ते बाबाजी चासकर, सरपंच रविंद्र वळसे पाटील तसेच धोंडीभाऊ भोर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी हॉटेल तिरंगाच्या संकल्पनेचे कौतुक करत उद्योजक नितीन भालेराव यांना शुभेच्छा दिल्या. “ग्राहकांना स्वच्छ, दर्जेदार आणि चविष्ट अन्न देणे हीच आमची प्राथमिकता राहील,” असे भालेराव यांनी यावेळी सांगितले. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आणि परिसरातील प्रवाशांसाठी दर्जेदार भोजनसेवा देण्याचा हॉटेलचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एकलहरे व परिसरातील नागरिकांनी उद्घाटनास मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रम यशस्वी केला. व्हेज-नॉनव्हेज दोन्ही प्रकारांचे विविध पदार्थ, स्वच्छता, प्रशस्त बैठक व्यवस्था आणि परवडणारे दर ही ‘हॉटेल तिरंगा’ची वैशिष्ट्ये ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.










