
भोसरी (पुणे) येथील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंदिरानगर येथे महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स स्पर्धा (ता.१३) आणि (ता.१४) डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाल्या असुन या स्पर्धेत खडकीफाटा (ता.आंबेगाव) येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी पाच हजार मीटर धावणे मध्ये सुवर्णपदक, दीड हजार मीटर धावणेमध्ये सुवर्णपदक आणि पाच हजार मीटर चालणे मध्ये सुवर्णपदक अशी एकूण एकाच स्पर्धेत तीन सुवर्ण पदके पटकावली आहेत.

जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून हरिश्चंद्र थोरात यांची निवड झाली आहे. मिळालेल्या यशाबद्दल खडकी, चांडोली बुद्रुक ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. ७२ व्या वर्षी देखील सुद्धा सुवर्णपदके मिळण्याचा प्रयत्न हरिश्चंद्र रामभाऊ थोरात हे करत आहेत. वयाच्या बहात्तरीत सुद्धा सुवर्णपदके मिळण्याचा सपाटा सुरू असून भोसरी येथे झालेल्या राज्यस्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेत चालणे आणि धावणे यामध्ये थोरात यांनी तीन सुवर्ण पदके पटकावले, तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी हरिश्चंद्र थोरात यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.












