
नवनाथ थोरात यांचाही समाजसेवा पुरस्काराने गौरव
दिव्यांग बांधव, कष्टकरी महिला, विधवा महिला, शेतकरी, समाजातील दुर्लक्षित घटकासाठी काम करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जनसेवक संजय भाऊ थोरात यांचा समाज भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा घोडेगाव येथील हरिचंद्र मंदिर हॉल येथे १५ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. यावेळी संजय भाऊ थोरात यांचे विश्वासू सहकारी नवनाथ थोरात यांचाही समाजसेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, विविध दिव्यांग संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संजय भाऊ थोरात म्हणाले की दिव्यांग संघटना व प्रहार संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवले जात असून दिव्यांगांना त्यांचे अधिकार विविध शासकीय योजना लाभ मिळावा यासाठी संघटना काम करत आहेत. माझ्या माध्यमातूनही अनेकदा दिव्यांग बांधवांसाठी मी काम केले असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजूबाजूला असलेल्या दिव्यांगांसाठी काम करणे गरजेचे आहे. दिव्यांग व्यक्ती व त्याचे कुटुंबाला समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामान्य माणसाची सेवा करणे हे मला आवडते. सर्व सामान्य जनता माझ्यासाठी सर्वस्व आहे असे संजय भाऊ थोरात म्हणाले.












