
शिरूर लोकसभेचा खासदार म्हणून पुणे नाशिक रेल्वे मंजुरीसाठी सन २००५ पासून संघर्ष केला आहे. आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातून निश्चित असलेला या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आल्याने भविष्यात या भागातील सर्वसामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून. सतत पंधरा वर्षे पाठपुरावा केलेला प्रकल्प दुसऱ्याच ठिकाणावरून जात असल्यामुळे हा पुणे–नाशिक रेल्वे मार्ग हा आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातून गेलाच पाहिजे यासाठी निर्णायक भूमिका ठरविण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सरपंच, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटना यांची एकत्रित बैठक मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात रविवार दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ पार पडली.
या बैठकीस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व मा.सहकारमंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी उपस्थित तालुक्यातील नागरिक विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा पूर्वी मंजूर झाला होता त्याच खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातून जावा अशी भूमिका मांडली असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, रेल्वेमंत्री यांच्याशी बैठक लावून चर्चा करण्यात येणार आहे हा मार्ग बाहेरून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत राज्य व केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास भविष्यात जन आंदोलन देखील उभारले जाईल असा इशारा देखील माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला आहे.













