
हिवाळी अधिवेशनात आंबेगाव – शिरूर तालुक्यातील आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य व तंत्र शिक्षण विभागासाठी २०२५/ २०२६ पूरक मागणी अंतर्गत ४९ कोटी ८९ लक्ष ६७ हजार रुपये उपलब्ध झाले असल्याची माहिती माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

आंबेगाव – शिरूर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या मागणीनुसार गोहे, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रुपांतरीत करण्यासाठी ७० लक्ष, ६१ हजार, तेरुंगण, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रुपांतरीत करणे. ६५ लक्ष, ७६ हजार. आहुपे, ता. आंबेगाव, जि.पुणे शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रुपंतरीत करणे. ६९ लक्ष, ३० हजार. अशी २ कोटी ५ लक्ष ६७ हजार रुपयांची कामे सुरू आहेत तर शिरूर तालुक्यातील मलठण येथील ग्रामीण रुग्णालयात फर्निचर, सीमा भिंत व विद्युतीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये, शिरूर तालुक्यातील पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयातील फर्निचर साठी एक कोटी २३ लक्ष रुपये, व आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील २०० खाटांचे सामान्य रुग्णालयासाठी ४४ कोटी चालू कामास निधी मंजूर झाला आहे.

तर अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीची दुरुस्ती व सुरक्षा भिंतींची उंची वाढविण्यासाठी ६१ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. आदिवासी भागासाठी २ कोटी ५ लक्ष ६७हजार, आरोग्यासाठी ४७ कोटी २३ लक्ष, तंत्रशिक्षण ६१ लक्ष असे एकूण ४९ कोटी ८९ लक्ष ६७ हजार रुपये मंजूर झाले असून काही कामे चालू आहेत तर काही कामे लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.












