
प्रतिनिधी -शिंगवे पारगाव / समीर गोरडे
सह्याद्री व्हॅली राजुरी तसेच श्री पारमार्थिक सेवा संघ मुंबई या संस्थेच्या,श्री भैरवनाथ विद्यालय शिंगवे कार्यरत असणारे गणीत विषयाचे प्राध्यापक मयुर घाडगे सर यांचे अपघाती निधन झाले. मयुर घाडगे यांचे मुळगाव पिंपरी पेठार असुन त्यांचे शालेय शिक्षण शिंगवे येथील मामाच्या गावी आजोबा गेनभाऊ बाबुराव गाढवे यांच्याकडे झाले, तसेच मयुरचे बालपण शिंगवे येथे गेले असुन सध्या शिंगवे आजोबांच्या घरी राहत होते, सह्याद्री व्हॅली राजुरी येथे जात असताना अपघाती निधन झाले आहे.शिंगवे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शोकाकुल प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे, शालेय व्यवस्थापन समिती शिंगवे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत शिंगवे,विविध पदाधिकारी, संस्था पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ शिंगवे यांसकडुन भावपुर्ण श्रद्धांजली. त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी ४ वाजता पिंपरी पेंढार या ठिकाणी होईल.












