
हुतात्मा बाबू गेणू यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच कै. न्यायाधीश राजकुमार आंबटकर यांच्या स्मरणार्थ शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर हु. बाबू गेणू स्मारक महाळूंगे, पडवळ, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पार पडणार असल्याची माहिती हुतात्मा बाबू घेणे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिली.

या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व रक्तदात्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून टी-शर्ट, प्रमाणपत्र व रक्तदात्यांसाठी एक वर्षासाठी रक्तपिशवी मोफत देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक जॅकेट मोफत भेट देण्याचीही व्यवस्था आयोजकांनी केली आहे.

या रक्तदान शिबिराचे आयोजन आपला माणूस, हु. बाबू गेणू युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान बाबाजी चासकर यांनी केले आहे.










