
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील वायळमळा येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवार दि. ९ /१२/२०२५ रोजी एक बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथील वायाळ मळा परिसरात मागील अनेक दिवसापासून बिबट्याने नागरिकांना दर्शन देणे छोट्या मोठ्या जनावरांवर हल्ला करणे अशा घटना घडल्या होत्या वनविभागाने पिंजरा लावून मागील काही दिवसापूर्वीच या ठिकाणी एक बिबट्या जेरबंद केला होता. पुन्हा बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांच्या मागणी नुसार वायाळमळा येथे अमोल वायाळ यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यामध्ये दिनांक ९ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नर जातीचा अंदाजे दीड ते दोन वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याला वनपाल एम. टी. मेरगेवाड, वनरक्षक एस के ढोले व बिबट कृती दल सदस्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन अवसरी वन उद्यान येथे नेले आहे.











