
जनसेवक रमेशभाऊ शिवाजी येवले यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवक रमेशभाऊ येवले प्रतिष्ठान, आंबेगाव-शिरूर यांच्या वतीने दिनांक २४/१/२०२६ रोजी भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण-तरुणींना वैवाहिक जीवनात उज्ज्वल सुरुवात मिळावी हा आहे.

हा सामुदायिक विवाह सोहळा दिनांक २४/१/२०२६रोजी घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील ग्रीन वैली मंगल कार्यालय कोटमदरा येथे पार पडणार असून वधू-वरांच्या नोंदणीसाठी आयोजकांनी पुढाकार घेतला आहे. समाजातील सर्व घटकांसाठी हा सोहळा विनामूल्य खुला असून आवश्यक सर्व सोयी-सुविधा प्रतिष्ठानतर्फे पुरवल्या जाणार आहेत. यासाठी विभाजनानुसार कार्यकर्ते आणि आयोजकांशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनसेवा आणि समाजधर्मी उपक्रमांतून अनेकांना मदत करण्याचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करत असून या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडणार असल्याचे जनसेवक रमेश भाऊ येवले यांनी सांगितले.

मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात नाव नोंदणीसाठी विजय केंगले – ८२०८७९५२६३, धनेश चासकर – ९६६५७०१३१३, अमोल शेवाळे – ९९७५१००६३०, विवेक लोहोट – ९९२२६६३४३२, संजय गावडे – ९९७५७७३२२६, तुषार पोखरकर – ७४४७६०४६५२, अमोल पोकळे – ८३९०८०२८०६, उत्तम घावटे – ७४९९०५१८९०, यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जनसेवक रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आहे.











