

आंबेगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून महाळुंगे पडवळ येथे शेतकरी मच्छिंद्र दत्तात्रेय सैद यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आहेत.

ऊसतोड करत असताना बिबट्याची डरकाळी ऐकू येत होती. या घटनेने ऊसतोड कामगारांमध्ये भीती पसरली असून, ऊसतोड बंद करून कामगारांनी घर गाठले. वनविभागाचे मंचर येथील कर्मचारी घटनास्थळाला भेट देत बिबट्याचे दोन्ही बछडे अवसरी येथील उद्यानात घेऊन गेल्याचे समजते. तालुक्याच्या उत्तर भागात ऊसतोड चालू आहे. त्यामुळे अनेक उसाच्या क्षेत्रात बिबट्याचे बछडे आढळून येत आहेत. दुसरीकडे बिबट्याचे जनावरांवरील हल्ले सुरूच आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याबाबत कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.











