

स्टोन क्रेशर व्यवसायईकाकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी विजयकुमार लहानु जेठे राहणार तीन्हेवाडी रोड राजगुरुनगर ता. खेड याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्टोन क्रेशर व्यवसायिक मगन म्हातारबा कराळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


मगन कराळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे म्हंटले आहे की त्यांचा महाळूंगे पडवळ येथे स्टोन क्रेशर चा व्यवसाय असून सर्व व्यवसाय कायदेशीर असताना तसेच व्यवसाय संदर्भात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाची परवानगी असताना राजगुरुनगर ता. खेड येथील विजयकुमार लहानू जेठे यांनी जाणून बुजून स्टोन क्रशर व्यवसाय बाबत वेगवेगळ्या कार्यालयात खोटे तक्रारी अर्ज देऊन तुमचा स्टोन क्रेशर चा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर मला दहा लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत आर्थिक स्वरूपात खंडणीची मागणी केली आहे. याबाबत मगन कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजयकुमार जेठे याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विजयकुमार जेठे यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणीही विविध गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर यादव करीत आहे.




विजय कुमार जेठे याच्यावर या अगोदरही दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच सामाजिक संस्था चालवत असताना पैशाचा गैरप्रकार केल्याचेही त्यांचेंबद्दल तक्रारी असून पर्यावरण मित्र असल्याचे सांगून अनेकांना धमकी देणे, त्यांच्या तक्रारी करने, चालु काम बंद पाडने, अशी कामे करत असल्याची तक्रार सर्व सामान्य लोक करत आहे. तसेच त्यांच्यावर चेक बाऊन्स चेही गंभीर गुन्हे दाखल आहेत. विजयकुमार जेठे हा समाजात पत्रकार म्हणुन वावरत असतो. मात्र समाज माध्यमात त्याने वार्तांकन केलेल्या बातम्या दिसत नाहीत. स्टोन क्रेशर पासुन निघणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूचे लोकांना त्रास होत होता. त्याचे वार्तांकन करुन आजुबाजूचे लोकांच्या प्रतिक्रिया घेवुन प्रशासनास या बाबत कारवाई करण्यास भाग पाडणे हे पत्रकाराचे काम असताना असे कुठलेही काम पत्रकाराचा बुरखा पांघरून घेतलेले जेठे यांनी केले नाही.










