
पोंदेवाडी फाटा ते मंचर (ता.आंबेगाव ) या रस्त्यावर वैद्यवाडी फाट्या जवळच बुधवार (दि.१८) रोजी सकाळी सात वाजण्याचा सुमारास हुंडाई कंपनीची सेंड्रो कार रस्यावरील विद्यूत खांबाचा अंदाज न आल्याने जोरात धडकल्याची घटना घडली असून या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार मधील एक जखमी झाला आहे.

या संदर्भात समजलेली माहिती अशी कि मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथून एमएच-१२/ व्हीवो-६७५९ या सेंट्रो कारने तीघे जण वैद्यवाडी फाटा मार्गे अवसरी खुर्द येथील इंजिनेअरींग कॉलेजला जात असताना या रस्त्यालगत तापकीर वस्ती नजदिक ३३ केव्हीचा विद्यूत खांब आहे.या खाबांचा अंदाज न आल्याने कार विद्यूत खाबांला धडकली व ३३ केव्हीची विद्यूत तार तुटली पण तार वरच्या वर अडकली व त्या ठिकाणी मोठा झाळ झाल्याचे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी सांगितले. अपघात झाला त्यावेळी गाडीतील एअर बॅग उगडल्याने मोठा अपघात होता होता टळला.

या अपघातात कारमधील एक जण जखमी झाल्याने त्याला पारगाव या ठिकाणी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. कारमध्ये वाल्मीक गवळी व अविष्कार मावळ व अन्य एक जण प्रवास करत होते. या रस्त्यावर रस्त्यालगत असणार्या विद्यूत खांबामूळे या अगोदर सुद्धा छोटेमोठे अपघात झाले आहेत.मात्र या ठिकाणी असणारा विद्यूत खांब वाहतुकीला मोठा अडथळा ठरत असल्याने हा विद्यूत खांब महावितरण कंपनीने एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहाता त्वरीत हलवण्यात यावा अशी मागणी सत्यवान वैद्य,बाळासाहेब वैद्य,तुषार वैद्य,सागर तापकीर,विकास कापडी,गणेश कापडी व येथील ग्रामस्थांनी केली आहे.











