
मांदळवाडी ता. आंबेगाव गावच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाला आमच्या भागात शेळ्या मेंढ्या चारायच्या नाहीत तलावाकडे बकऱ्या घेऊन यायच्या नाही तलावाचे पाणी पाजायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बायडाबाई लहानू कोळपे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी बायडाबाई लहानू कोळपे व त्यांचे कुटुंबीय हे मेंढपाळ असून ते सध्या मांदळवाडी ता. आंबेगाव येथे वास्तव्यास आहेत दि.१८/१२/२०२५ रोजी दुपारी सव्वा एक वाजल्याच्या दरम्यान कोळपे कुटुंबीय ते मांदळवाडी ते पिंपळवाडी जाणाऱ्या रोडवर शेळ्या मेंढ्या घेऊन जात असताना त्या ठिकाणी पोपट चंदर आदक, संस्कार पोपट आदक, सुनीता पोपट आदक, चंदर नारायण आदक, व एक अल्पवीन मुलगा सर्व रा. मांदळेवाडी यांनी अडवून ये धनगड्यानो अजिबात तलावामध्ये बकऱ्यांना पाणी पाजायचे नाही, तुमची बकर रस्त्याच्या खाली उतरावयाची नाही असे म्हणत पोपट आदक याने कुऱ्हाडीने फिर्यादीच्या नवऱ्याला कपाळावर कुऱ्हाड मारून जखमी केले तसेच इतरांनी दगड फेकून मारत शिवीगाळ दमदाटी केली सुनिता पोपटआदक हिने फिर्यादी महिला व तिची मुलगी गऊबाई शिंदे हिला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच या सर्वांनी पुन्हा या ठिकाणी बकरी घेऊन यायचे नाही आले तर तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.












