

शिंगवे ता. आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माॅडेल स्कुल शिंगवे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी बॅलेट पेपरद्वारे झालेल्या निवडणुकीत समीर गोरडे यांना ७ मते पडल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.


या निवडणूकित अध्यक्ष पदासाठी समीर गोरडे, गोरक्षनाथ जगताप, वैजनाथ येथे, रमेश डोके यांचे अध्यक्षपदासाठी एकुण ४ अर्ज आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सिनलकर सर यांनी काम काज पाहिले तर निरीक्षक म्हणून वळती केंद्राचे केंद्रप्रमुख राजू जाधव,शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित,माजी उपसरपंच संतोष माळी बुवा, पत्रकार नवीन सोनवणे यांनी काम पाहिले.


यावेळी उपाध्यक्ष पदासाठी रेखा पाबळे यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच अध्यक्षपदासाठी चार अर्ज आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी समीर गोरडे यांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी ७ मतांनी विजयी झाले.अशा पद्धतीने बॅलेट पेपर वर घेतलेली मतदान प्रक्रिया संपन्न झाली. अध्यक्षपदी समीर गोरडे तर उपाध्यक्षपदी रेखा पाबळे यांची निवड करण्यात आली यावेळी गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांनी अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदाची घोषणा केली अशा पद्धतीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिंगवे शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक पार पडली.












