

पुणे – नाशिक महामार्गावर परळ ते साकोरी या एसटी बस चालकास, व बस मधील एका प्रवाशास मारहाण केल्याप्रकरणी प्रदीप दत्तात्रय माशेरे, सिद्धेश दत्तात्रय माशेरे दोघे रा. मंचर ता. आंबेगाव यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एस टी बस चालक भरत पांडुरंग बुगदे याने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की दि.४/१२/२०२५ रोजी परळ आगाराची परळ – साकोरी एसटी बस एम.एच १३ सी यु ६०६५ तिचा वाहक अमित अरुण कर्पे, चालक भरत पांडुरंग बुगदे हे बसमध्ये प्रवासी घेऊन जात असताना बस पुणे – नाशिक महामार्गावर अवसरी फाटा येथे आली असता. एका थार चालक व बस चालकाची कट मारल्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता हा वाद मिटवून एसटी बस सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मंचर बस स्थानकावर आली असता त्या ठिकाणी असलेल्या दोन युवकांनी एसटीचा दरवाजा उघडून बसमध्ये शिरून बस चालक भरत बुगदे यास तुम्ही थार गाडीवाल्या बरोबर भांडण का केली असे म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यावेळी बस वाहक अमित कर्पे व एक प्रवासी भांडणे सोडवण्यासाठी आला असता त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.


काही वेळानंतर ते मंचर बस स्थानकावरून निघून गेले तेव्हा जमलेल्या लोकांकडून त्यांची नावे प्रदीप दत्तात्रय माशेरे, सिद्धेश दत्तात्रय माशेरे दोन्ही रा. मंचर ता. आंबेगाव असे असल्याचे समजणे त्यावेळी बसमध्ये प्रवासी असल्याने त्यांना उशीर होईल म्हणून बस चालकाने त्यांना साकोरी ता. जुन्नर येथे सोडूले व नंतर याबाबत मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंचर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार किर्वे करत आहे.












