तांबडे मळा (अवसरी खुर्द) ता. आंबेगाव येथील करण रखमाजी तांबडे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाली. तांबडे मळा आणि अवसरी ग्रामस्थानी करण याची गावातून सवाद्य मिरवणूक काढून त्याचे अभिनंदन केले.
तांबडेमळा आणि अवसरी ग्रामस्थानी करण याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल मिरवणूक काढली त्यावेळी सत्काराला उत्तर देताना करण तांबडे म्हणाला की लहानपणापासुन ते इथपर्यंतचा प्रवास ही माझ्या साठी एक परिक्षाच होती. लहानपण पण हे खेड्यात गेल्यामुळे बालपणापासूनच खेळण्याची, देशसेवा करण्याची एक आवड निर्माण झाली होती. मी आर्मी भरतीचा सराव करत असताना खुप अपयश, संकट आली परंतू संकटांना डगमगुन न जाता त्यांना सामोरे जावून माझ जे स्वप्न होत ते पुर्ण केल.या माझ्या यशामागे आई अनिता आणि वडील रखमाजी,आजी आजोबा यांचे खुप सहकार्य मिळाले. सुनील निघोट मोलाचे मार्गदर्शन लाभले.करण तांबडे याचे प्राथमिक शिक्षण तांबडे मळा येथील जि.प्र. प्राथमिक शाळेत झाले. माध्यामिक शिक्षण विद्या विकास मंदीर अवसरी बुद्रुक तसेच भैरवनाथ विद्यालयअवसरी खुर्द येथे झाले. पुढील अकरावी बारावी महात्मा गांधी विद्यालय मंचर यायेथे झाले . पुढील शिक्षणासाठी कुरण तालुका जुन्नर येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मध्ये अभियांत्रिकी(Engineering) विद्यालयामध्ये प्रवेश घेतला.इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना आर्मी साठी तयारी करत होतो .









